Home राजधानी मुंबई मास्क, सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठी सरकारचे हे आदेश

मास्क, सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठी सरकारचे हे आदेश

77

मुंबई : मास्क आणि सॅनिटायजरच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाने नेमलेल्या चार सदस्यीय समितीला तीन दिवसात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.                                                                                                  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्क आणि सॅनिटायजरचा वापर वाढला असून त्यांच्या किमती निश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत समिती गठित करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री टोपे आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार ३१ जुलै रोजी आरोग्य विभागाने समिती गठित केली. यात राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे अध्यक्ष असून हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य औषध नियंत्रण प्राधिकारी सहआयुक्त हे सदस्य असून आरोग्य संचालक समितीचे सदस्य सचिव आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांकडून मास्क आणि सॅनिटायजरचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. कोरोनावर सध्या तरी प्रतिबंधात्मक उपाय हेच औषध असल्याने आणि नागरिकांनाही वेळोवेळी मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करण्याबाबत आवाहन करण्यात येत असल्याने दोन्ही वस्तूंची मागणी वाढली आहे. या दोन्ही बाबी नियंत्रित दराने मिळण्यासाठी मास्क, सॅनिटायजरच्या कमाल किमती ठरवायच्या आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here