Home राजधानी मुंबई आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

133

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास बॉम्बे हॉस्पिटल येथे दीर्घ आजाराने निधन झाले. शारदाताई टोपे यांच्यावर 2 आॅगस्ट 2020 रोजी सायंकाळी चार वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर जिल्हा जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
शारदाताई टोपे अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर दाखल होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरी होत्या. मात्र, पुन्हा प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.