नवी दिल्ली : राज्यसभा खासदार समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांचे प्रदीर्घ आजाराने सिंगापूरमध्ये निधन झाले आहे. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला.
अमर सिंग हे समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस होते. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून त्यांना ओळखले जात. दिल्लीच्या राजकीय क्षेत्रात अमर सिंह यांच्या नावाची नेहमीच चर्चा असायची. 2016 मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ ते आजारी होते. त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. आरोप झाल्याने त्यांना समाजवादी पक्षातून बरखास्त केले होते. जया बच्चन, अमिताभ बच्चन, जयाप्रदा यांना राजकारणात आणण्याचे श्रेय त्यांनाच देण्यात येते.