Home राष्ट्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

90

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने स्वपक्षासह विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची प्रकृती लवकर ठिक व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोनाचे सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर मी चाचणी केली. त्यानंतर माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तब्येत ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. मागील काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला आयसोलेट करून घेऊन स्वत:ची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्वीट करत अमित शाह यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.