लखनौ : उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कमलराणी वरुण यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले. त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते.
माहितीनुसार, कमलराणी यांच्या शरीरात लक्षणे आढळल्यानंतर त्यांची १७ जुलै रोजी तपासणी करण्यात आली. त्यानंतर १८ जुलैला चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना लखनौमधील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र, आज रविवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या कानपूरमधील घाटमपूर मतदारसंघाच्या प्रतिनिधित्व करत होत्या.