चंदीगड : पंजाबमध्ये विषारी दारू पिऊन मरण पावलेल्या नागरिकांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. एकट्या तारण जिल्ह्यात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महसूल आणि पोलिस विभागातील एकूण १३ कर्मचाºयांना निलंबित करण्यात आल्याचे समजते.
अंमली पदार्थांचा अवैध व्यवहार करणाºया माफियांशी दारू घटनेशी संबंध आहे का, याबाबत धागे जुळवून पाहण्यात येत आहे. कर्तव्यात हयगय केल्याबद्दल उत्पादन शुल्क विभागातील सात अधिकारी, दोन पोलिस उपअधीक्षक आणि चार एसएचओंना निलंबित केले आहे. धक्कादायक म्हणजे काही गावात गावकरी एखाद्याचा अंत्यसंस्कार करून परत येईपर्यंत आणखी दोन-तीन मृत्यू झालेले असतात. अनेक गावांमध्ये मागील ३६ तासांपासून चूलही पेटलेली नसल्याचे सांगण्यात येते. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. (प्रतिकात्मक छायाचित्र)