केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल : महाराष्ट्राचे मोठे यश

(Last Updated On: August 4, 2020)

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातील एकूण 829 यशस्वी उमेदवारांपैकी महाराष्ट्रातील 90 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून अभिषेक सराफ हा प्रथम तर नेहा भोसले दुसºया क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानुक्रमानुसार दोघेही आठव्या आणि 15 व्या स्थानावर आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2019 च्या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. यात गुणानुक्रमे आठव्या स्थानावर अभिषेक सराफ, नेहा भोसले 15 व्या स्थानावर, मंदार पत्की 22 व्या स्थानावर, आशुतोष कुलकर्णी 44 व्या स्थानावर, योगेश पाटील 63 व्या स्थानावर, विशाल नरवाडे 91 व्या स्थानावर आहेत. दिव्यांगामधून राज्यातील जयंत मंकले 143 व्या स्थानावर आहेत. पुण्याचा दिव्यांग उमेदवार जयंत मंकले याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2019 च्या परीक्षेत 143 वा क्रमांक मिळविला आहे. यापूर्वी जयंतने 2018 साली परीक्षा दिली होती.
महिला उमेदवारांचीही बाजी
यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात महाराष्ट्रातील 12 महिला उमेदवारांनी बाजी मारली आहे. या मध्ये नेहा भोसले यांना गुणांनुक्रमानुसार 15 वे स्थान मिळाले आहे तर महाराष्ट्रातून त्या पहिल्या ठरल्या आहेत. याशिवाय नेहा दिवाकर देसाई (137), अश्विनी तानाजी वाकडे (200), गौरी पुजारी (275), नेहा किरडक (383), डॉ. प्रणोती संजय संकपाल (501), अंकिता अरविंद वाकेकर (547), पूनम प्रकाशराव ठाकरे (641), प्रियंका कांबळे (670), प्रज्ञा खंडारे (719), अनन्या किर्ती (736).      महाराष्ट्रातील उमेदवार असे
अभिषेक सराफ (8), नेहा प्रकाश भोसले (15), मंदार जयवंतराव पत्की (22), आशुतोष कुलकर्णी (44), दिपक करवा (48), योगेश अशोकराव पाटील (63), विशाल तेजराव नरवडे (91), मयूर खंडेलवाल (106), राहूल लक्ष्मण चव्हाण (109), विनोद पाटील (132), कुलदीप जंगम (135), नेहा दिवाकर देसाई (137), जयवंत किशोर मनकाळे (143), अभयसिंह बाळासाहेब देशमुख (151), शेख मोहमद झेब झाकीर (153), अश्विनी तानाजी वाकडे (200), सागर भारत मिसाळ (204), माधव विठ्ठलराव गित्ते (210), कुणाल मोतीराम चव्हाण (211), सचिन हिरेमठ (213), सुमित महाजन (214), श्रेणिक लोढा (221), अविनाश शिंदे (226), शंकर गिरी (230), श्रीकांत खांडेकर (231), योगेश कापसे (249), आयुष खरे (267), गौरी पुजारी (275), गजराज बच्छावत (277), शंतनू अत्रे (281), प्रसाद शिंदे (287), रजनिश पाटिदार (307), आकाश अग्ले (313), मंदार देशपांडे (334), रजत उभयकर (378), आदित्य काकडे (382), नेहा किरडक (383), निमिश पाटील (389), महेश गिते (399), अभिषेक शिवहरे (414), कांतीलाल सुभाष पाटील (418), अमित कुमावत (423), अविनाश जगधवर (433), परमानंद प्रवीण दराडे (439), स्वप्नील पवार (448), ऋषिकेश जयसिंग देसाई (481), नकुल राजेंद्र देशमुख (489), शुभ्रमण्य भालचंद्र केळकर (497), डॉ. प्रणोती संजय संकपाल (501), सुमित कैलास जगताप (507), दीपक धनखेर (520), प्रसन्न लोढा (524), नवनाथ शिवाजी माने (527), प्रफुल्ल देसाई (532), वैभव हिरवे (541), अंकिता अरविंद वाकेकर (547), विजयसिंहराव साहेबराव गिते (550), समीर प्रकाश खोडे (551), सुरेश कैलासराव शिंदे (574), अभिनव प्रविण इंगोळे (624), अजय गणपती कुंभार (630), स्वप्नील जगन्नाथ पवार (635), अभिषेक दिलीप दुधाळ (637), पूनम प्रकाशराव ठाकरे (641), अशित कांबळे (651), करूण गरड (656), प्रियंका कांबळे (670), ऋषिकेश देशमुख (688), सौरभ व्हटकर (695), अक्षय भोसले (704), अभिजीत सरकटे (710), प्रज्ञा खंडारे (719), साकेत धवने (727), निखिल दुबे (733), राजीव मेश्राम (735), अनन्या किर्ती (736), शशांक माने (743), निखिल कांबळे (744), सुमित रामटेके (748), शुभम भैसारे (749), निलेश गायकवाड (752), कुणाल उत्तम शिरोटे (765), वैभव वाघमारे (771), अश्विन गोलपकर (773), विधित्या नायक (780), किशोर सुत्रधार (784), सरगम शिंदे (785), सर्वेश सोनवाणी (787), अजिंक्य विद्यागर (789), सत्यजित यादव (801), समिर महाजन (810), सुनिल शिंदे (812), हेमंत नंदनवार (822), स्वरूप दीक्षित (827). यापैकी यशस्वी झालेल्या 66 उमेदवारांची निवड तात्पुरती आहे. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ँ३३स्र://६६६.४स्र२ू.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *