Home राजधानी मुंबई एसटी महामंडळाला 550 कोटींचा निधीचा बूस्ट

एसटी महामंडळाला 550 कोटींचा निधीचा बूस्ट

83

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) 550 कोटी रुपयांचा निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटीसमोरील वाढलेली आव्हाने, महसुलात झालेली घट लक्षात घेऊन एसटी महामंडळाला हा निधी देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात आज एसटी महामंडळाच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. परिवहनमंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, वित्त विभागाचे, तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत एसटीला 550 कोटी देण्याचा निर्णय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला. या निर्णयामुळे महामंळासमोरील आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. यावेळी महामंडळाच्या सद्यस्थितीवर चर्चा होऊन आढावा घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे महामंडळाला मोठा दिलासा मिळणार आहे.(महासंवाद)