Home राष्ट्रीय ऐतिहासिक श्रीराममंदिराचा भूमिपूजन सोहळा आज, पंतप्रधान मोदींंची उपस्थिती

ऐतिहासिक श्रीराममंदिराचा भूमिपूजन सोहळा आज, पंतप्रधान मोदींंची उपस्थिती

67

अयोध्या : ऐतिहासिक श्रीराममंदिराच्या भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी दुपारी 12 वाजून 44 मिनिटे 15 सेकंदांनी पार पडत आहे. दरम्यान, अयोध्या आणि परिसरातील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
सूत्रांनुसार, अयोध्येत बुधवारी श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी एकूण तीन तास अयोध्यामध्ये राहतील. मंदिर भूमिपूजनापूर्वी ते हनुमानगढी येथे पूजा करतील. यानंतर दुपारी 12 वाजता रामजन्मभूमी परिसरात दाखल होतील. 12 वाजून 44 मिनिटे आणि15 सेकंदांनी भूमिपूजन करतील. दरम्यान, राममंदिराच्या सोहळ्यासाठी देशभरातून अनेक रामभक्त अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण शहरात प्रभू श्रीरामांच्या जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. अनेक भिंतीवर मोठमोठे चित्रही काढण्यात आली आहे. मोठे पूल, उद्याने आदींसह महत्त्वाच्या ठिकाणांची दुरुस्ती केली आहे. प्रभूरामाच्या मंदिर निर्मिती कार्यक्रमाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. सकाळी मंदिराच्या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजतापर्यंत गणेश पूजन पार पडले. हिंदूधर्मात कुठल्याही शुभकार्याआधी गणेशाची पूजा केली जाते.
मोठी सुरक्षा
अयोध्यानगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाच्या निमित्ताने संपूर्ण शहर आणि परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लहान मोठ्या मार्गांवर तपासणी सुरू ठेवण्यात येणार आहे. अयोध्याशेजारील जनपद बस्ती, गोंडा, आंबेडकरनगर, बाराबंकी, सुलतानपूर, अमेठी आदी शहरांमध्ये नोडल अधिकाºयांची नियुक्ती केली आहे. शरयू नदीच्या माध्यामातून कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी जलसेना तैनात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही, राखीव दल, वाहतूक पोलिसांची पथके रस्त्यारस्त्यावर तैनात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पुजारी, स्वयंसेवक आदींना ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. (प्रतिकात्मक छायाचित्र)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here