Home BREAKING NEWS लेबनानमध्ये स्फोट, 27 मृत, 2700 जखमी

लेबनानमध्ये स्फोट, 27 मृत, 2700 जखमी

81

बैरूत : लेबनानची राजधानी बैरूतमध्ये संध्याकाळच्या सुमारास दोन मोठे स्फोट झाले आहेत. यात दहाजणांचा मृत्यू झाल्याची तसेच शेकडोजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटकांच्या कारखान्यात वा साठ्याजवळ वा दारूगोळा कारखान्यात हा भीषण अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सूत्रानुसार, स्फोटामुळे शहराचा मोठा भाग हादरला. रस्त्याला भेगा पडल्या आणि आसपासच्या इमारतींनाही धक्का बसला. शिवाय अनेक लहान मोठी घरे कोसळल्याचे वृत्त आहे. दुर्घटनेनंतर घटनास्थळ आणि परिसरात दाट धूर पसरला असून तो दूर झाल्यानंतर परिस्थितीचा एकूण अंदाज येणार आहे. आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. कदाचित हा आकडा वाढू शकतो. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देशाचे आरोग्य मंत्री हमाद हसन यांनी दिली. घटनास्थळ हे बंदराजवळ असून परिसरात अनेक गोदामे आहेत. प्रत्यक्षदर्शीनुसार अनेकांनी स्फोटाचा आवाज काही किमी अंतरावरून ऐकला. सुरुवातीला भूकंपाचा धक्का असल्याचे जाणवले होते. दरम्यान, एबीपी न्यूजने या दुर्घटनेत सुमारे 2700 लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे.
लेबनान देशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासाने मदतीचे फोन क्रमांक दिले आहेत. संकटाच्या या परिस्थितीत सगळ्यांनी शांत राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here