Home राजधानी मुंबई मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा

मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा

63

मुंबई : पुढील तीन तासात मुसळधार अतिमुसळधार पाऊस [heavy rain ] पडेल. ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरपरिस्थितीचा आढावा घेत आहेत.
मुंबईसह उपनगरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. वादळी वाºयांसह जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील तीन तासांसाठी मुंबई आणि शहरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील नऊ तासांत 229.6 मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याचे कोलाबा वेधशाळेने म्हटले आहे.
अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन वा अन्य ठिकाणी अडकून फोडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली.
दुसरीकडे, दक्षिण मुंबईत वादळ वारा व जोरदार पाऊसमुळे काही ठिकाणी वृक्ष पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
नागरिकांनी मुंबईतील मुसळधार पावसामुळे घराबाहेर न पडण्याचे मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी आवाहन केले आहे. आपातकालीन परिस्थितीमध्ये मुंबई पोलिसांशी 100 या क्रमांकावर अथवा ट्विटरवर संपर्क साधवा, असेही त्यांनी म्हटले आहे.
दृश्यवृत्त
* अनेक रस्ते पाण्याखाली गेलीत
* झाडे कोसळल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
* दादर चर्चगेट परिसराला तळ्याचे स्वरुप
* भले मोठे झाड बसस्थानकावर कोसळले
* मस्जिद बंदर स्थानकाजवळ दोन लोकलमध्ये 400 प्रवासी अडकले
* डी.वाय. पाटील स्टेडियमचे नुकसान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here