Home रानशिवार राज्यातील पावसासंबंधी मोठी बातमी

राज्यातील पावसासंबंधी मोठी बातमी

81

पुणे : भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण पट्टा, मध्य महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कुलाब्यामध्ये आज आत्तापर्यंत कुलाब्याला २९३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १० आॅगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती. दुसरीकडे कोकणातही आज दिवसभर दमदार पाऊस कोसळला. रायगडमधील सावित्री आणि कुंडलिका नद्यांना पूर आला आहे. अनेक भागांमधून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. कोल्हापुरातही मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाºयाची पाणीपातळी ३७ फूट ९ इंचावर गेली आहे. पंचगंगा नदीची ३९ फुट असलेली इशारा पातळी ओलांडून ४३ फुटीची धोका पातळीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावकºयांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. (प्रतिकात्मक छायाचित्र)