शिक्षणातील अग्रेसर राज्य बनविणार : वर्षा गायकवाड

(Last Updated On: August 8, 2020)

मुंबई: सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन, आॅनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
आतापर्यंत सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी नोंदणी केली आहे. गुगलसोबत शिक्षणक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासंबधी दीर्घकालीन भागीदारीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जी स्वीट फॉर एज्युकेशन आणि गुगल क्लासरूम सारखे विनामूल्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्दल आणि या परिस्थितीशी जुळवून घेत विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करत असलेल्या सर्व शिक्षकांचे प्रा. गायकवाड यांनी आभार मानले.
गुगलचे भारतातील विक्री प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणाले की कोविड विषाणूच्या प्रादुभार्वामुळे देशातील सुमारे ३२ कोटीहून अधिक मुलांच्या शिक्षणात खंड पडला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यास गुगल कटीबद्ध असून राज्यासोबत सुरू झालेली ही भागीदारी भविष्यात अधिक समृद्ध होईल. जी स्वीट इंटरनेटद्वारे दिली जाणारी माहितीचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांचे शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासन करित असलेले प्रयत्न निश्चितच प्रशंसनिय आहेत, असेही ते म्हणाले.
ठळक बाबी
शिक्षणासाठी जी स्वीट : जीमेल, डॉक्स आणि ड्राइव्ह तसेच क्लासरूमसह परिचित संप्रेषण आणि सहयोग साधनांचा विनामूल्य संच. हे कोठेही, केव्हाही आणि डिव्हाइसच्या श्रेणीवर शिकण्यास सक्षम करते. गूगल क्लासरूम : जी स्वीट फॉर एज्युकेशन मधील एक सोपं पण शक्तिशाली साधन, जे शिक्षकांना सहजपणे असाईनमेंट तयार करण्यास, पुनरावलोकन करण्यास आणि आयोजित करण्यात मदत करते. शिवाय वर्गात किंवा दूरस्थ शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास मदत करते. गूगल फॉर्म : एक सोपा प्रश्न आणि प्रतिसाद साधन जे शिक्षकांना क्विझ आणि चाचण्या लवकर तयार करण्यासाठी प्रश्न भरण्यास किंवा आयात करण्यास अनुमती देते. असाईनमेंट्स : एक असे साधन जे शिक्षकांना लवकर आणि सुरक्षितपणे तयार करण्यास, विश्लेषण करण्यास आणि ग्रेड कोर्सवर्क करण्यास आणि विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अधिक लवचिकता प्रदान करण्यास अनुमती देते.(महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *