अत्यंत दुर्दैवी घटना, एअर इंडियाच्या विमानाचे दोन तुकडे

पीक शिवार

नवी दिल्ली : पाऊस सुरू असताना धावपट्टीवर टेकताच घसरून दरीत कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचे [air india plane crash] दोन तुकडे झाले आहेत. दुर्घटनेत विमानाच्या दोन पायलटसह 16 जणांचा मृत्यू झाला आहे. 123 प्रवासी जखमी, तर अन्य15 प्रवासी गंभीर जखमी असल्याचे समजते. हा अपघात केरळमधील कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास घडला.
माहितीनुसार, सुमारे 191 प्रवाशी (10 मुलांचा समावेश) आणि दोन पायलटसह सहा कर्मचारी असलेले एअर इंडियांचे आयएक्स-1344 हे विमान 7.45 च्या सुमारास उतरण्याच्या तयारीत होते़ धावपट्टीवर टेकताच ते घसरून पुढे निघून गेले आणि शेजारच्या दरीत कोसळले़ दोन तुकडे होऊन 17 जणांचा मृत्यू झाला. यात वैमानिक दीपक वसंत साठे यांच्यासह त्यांचे सहकारी आणि अन्य लोकांचा समावेश आहे.
नागरी विमान उड्डाण संचालनालयाने दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. कोझिकोडमध्ये विमान अपघात झाल्याने दु:खी झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करतो. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोलणे झाले आहे. जखमींना सर्व मदत मिळत आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे. अन्य एका माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धावपट्टी निसरडी होऊन विमान घसरले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे.
भूस्खलनात 15 मृत
दरम्यान, भूस्खलन होऊन 15 जणांना प्राण गमावावे लागले आहे. तसेच, अन्य 50 लोक ढिगाºयात दबल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना शुक्रवार सकाळी साडेअकराच्या सुमारास इडुक्की जिल्ह्यात घडली़. (छायाचित्र सौजन्य : एएनआय)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *