एकदा नमूनं आपल्या नवºयाला विचारलं…का हो, जर मी तुम्हाला 3-4 दिवस दिसले नाही, तर तुम्हाला कसं वाटेल?
हेमू मनातल्या मनात जाम खूष झाला…उकळ्या फुटल्या. पट्टक्कन बोलला…मला तर खूप बरं वाटेल आणि मी खूष होईल..
.
मंग काय..
.
बायको सोमवारी नाही दिसली…
.
मंगळवारी नाही दिसली…
.
बुधवारीही नाही…
.
गुरुवारही खाली गेला.
.
शुक्रवारी जेव्हा डोळ्यांची सुज कमी झाली, तेव्हा कुठं थोडी…थोडी… दिसली.
***
ग्रह कोणता…. तर मंगळ
पृथ्वीपासून लाखो किलोमीटर लांब.
कामधंदा काय, तर केव्ळ भारतीय लोकांचं लग्न मोडणं…
***
बिंद्या : उंदीर मारायचंय, औषध द्यावा.
दुकानदार : घरी न्यायचंय का…?
बिंद्या : नाही, उंदीर आणलाय सोबत. इथंच भरवतो त्याला.
***
रेल्वेगाडीत गावाकडील बाई बाळाचं लंगोट बदलत असते.
शहरी बाई : हग्गीस नाही का?
गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस…
***
दिन्या पहिल्यांदाच सासुरवाडीला जातो…स्वागतही मस्त होते.
दुपारी जेवणात त्याला न आवडणारी मेथीची भाजी असते.
पहिलाच दिवस…म्हणून बिचारा गुमानं खातो.
सासूबाई वरून कौतुकानं सांगते, आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही!
रात्री जेवणात पाहतो तर काय, मेथीचं पिठलं. एकदा बायकोकडं पाहत गप्प गिळतो.
दुसºया दिवशी दुपारी पुन्हा मेथीचं वरण. यावेळी आपल्या सुंदर बायकोकडं पाहून बिचारा संयम बाळगतो.
सायंकाळी मात्र दिन्या स्वत:च सासूबाईंना सांगतो, आत्याबाई,
रात्रीचा माझा स्वयंपाक करू नका़ तुमचा तो मेथीचा मळा कुठं आहे तेवढं सांगा़ मीच तिकडून चरून येतो.
*****