संजयबाबाचा स्वॅब निगेटिव्ह

(Last Updated On: August 9, 2020)

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते संजय दत्त यांचा स्वॅब निगेटिव्ह आल्याची माहिती आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.                                      माहितीनुसार, संजय दत्त यांना शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 61 वर्षीय संजय दत्त यांची कोविड-19 अँटीजेन टेस्ट करण्यात आली. ही नेगेटिव्ह आली आहे. तसेच, स्वॅब टेस्टही घेण्यात आली होती. रविवारी सकाळी चाचणीचा अहवाल मिळाला असून कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, अभिषेक बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर शनिवारी सुटी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *