Home BREAKING NEWS देशात ‘कचरामुक्त भारत अभियाना’ची सुरुवात

देशात ‘कचरामुक्त भारत अभियाना’ची सुरुवात

197

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कचरामुक्त भारत अभियानाची घोषणा केली़ तसेच,राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन केले़
महात्मा गांधींच्या स्वच्छतेविषयीच्या विचारांना श्रद्धांजली म्हणून केंद्र्र सुरू करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानाचा कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात मोठा हातभार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लहान मुलांनी सुरक्षित शारीरिक अंतराच्या नियमाचं पालन करत मास्क परिधान करावे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या तीन वेगळ्या विभागांचा दौरा केला. त्यांनी प्रथम हॉल एकमध्ये एक अनोखे 360 अंश कोनातील दृकश्राव्य सादरीकरण अनुभवले. त्यानंतर हॉल 2 मध्ये स्वच्छ भारत मोहिमेवरील इंटरएक्टिव एलईडी पॅनेल, होलोग्राम बॉक्स, आंतर-संवादी खेळाची पाहणी केली. आजपासून सुरू झालेले अभियान १५ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.