Home राष्ट्रीय ‘डीजीसीए’ ने विमानतळ संचालकांना नोटीस बजावली होती

‘डीजीसीए’ ने विमानतळ संचालकांना नोटीस बजावली होती

63

नवी दिल्ली : कोझिकोड विमानतळावरील अनेक ठिकाणी सुरक्षाविषयक विविध त्रुटी आढळल्यानंतर नागरी उड्डयन महासंचालनालय अर्थात ‘डीजीसीए’ने 11 जुलै 2019 रोजी विमानतळ संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये धावपळीवरील तडे, पाणी साचणे आणि जास्त रबर जमा करणे यासह अनेक त्रुटींचा उल्लेख केला होता. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.
सौदी अरेबियाच्या दम्मम येथून एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचा मागील भाग 2 जुलै 2019 रोजी कोझिकोड विमानतळावर उतरताना धावपट्टीवर घसरला होता. या अपघातानंतर डीजीसीएने तपासणी केली होती. जवळपास एक वर्षानंतर शुक्रवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास पावसात दुबईहून एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान कोझिकोड येथील करिपूर विमानतळावरील दरीत कोसळले होते. यावेळी विमानाचे दोन तुकडे होऊन दोन वैमानिकांसह किमान 18 जणांचा मृत्यू झाला.
वरिष्ठ अधिकाºयानुसार, 2 जुलै 2019 रोजी झालेल्या अपघातानंतर डीजीसीएने 4 आणि 5 जुलै रोजी विमानतळाची पाहणी केली असता सुरक्षा क्षेत्रातील अनेक त्रुटी सापडल्या. यानंतर विमानतळ संचालक के. श्रीनिवास राव यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यात म्हटले की रनवे 28 टीडीझेड आणि रनवे 10 टीडीझेडमध्ये तडे गेले आहेत. हवाईपट्टीवर उतरताना टीडीझेड क्षेत्रात विमानाचा प्रथम संपर्क येत असतो. (प्रतिकात्मक छायाचित्र)