Home राष्ट्रीय देशातील संरक्षण उत्पादन क्षमता वाढवणार

देशातील संरक्षण उत्पादन क्षमता वाढवणार

269

नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने आत्मनिर्भर भारत अंतर्गत 101 हून अधिक वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत घोषणा केली आहे.
यासंदर्भातील एका यादीनुसार संरक्षण साहित्याच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. देशातील उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रात निर्मिती व्यावसायाला मोठी संधी मिळेल, असे राजनाथ सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.