Home राष्ट्रीय प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे निधन

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे निधन

78

इंदूर : दो गज सही मगर यह मेरी मिल्कियत तो है, अशा संवेदनात्मक भावना व्यक्त करणारे प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
राहत इंदौरी यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अरबिंदो रुग्णालयात दाखल केले होते. आज त्याचे निधन झाले. आज सकाळी त्यांनी स्वत: संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल झाल्याचे ट्विटरवर सांगितले होते. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसल्यानंतर काल (सोमवारी)चाचणी केली. याचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मी आॅरबिंदो इस्पितळात भरती झालो आहे. सध्या संपूर्ण देशभरातून सर्वसामान्यांसह राजकारणी आणि कलाकार मंडळी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
उपमुख्यमंत्री पवार यांची श्रद्धांजली
मुंबई : हम अपनी जान के दुश्मन को अपनी जान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं…सारख्या शेरो-शायरीच्या माध्यमातून कोट्यवधी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवणारे प्रसिद्ध शायर राहत इंदौरी साहेबांचे निधन ही भारतीय कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक विषयांवर मार्मिक भाष्य करणारा, भावना, वेदना, संवेदनांना जिवंत करणारा, शब्दांचा जादूगार हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.