Home राजधानी मुंबई ईआयए मुसदा : आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र

ईआयए मुसदा : आदित्य ठाकरेंचे केंद्र सरकारला पत्र

43

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (ईआयए) अधिसूचनेच्या मसुद्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. [minister aaditya thakre’s letter against EIA] या मसुद्याचे फेरमूल्यांकन करण्याची त्यांनी विनंती केली आहे.
सध्या अस्तित्त्वात असलेली अधिसूचना पॅरिस कराराशी जुळत नाही आणि आपल्या शाश्वत वाढ साध्य करण्याच्या उद्दिष्टाला मोठा धोका निर्माण करणारी आहे. कोल प्रॉस्पेक्टिंग, धातूचे क्रशिंग आणि स्क्रीनिंग, तेल आणि वायू उत्खननासाठी केलेले सर्वेक्षण यासारख्या पर्यावरणासाठी विध्वंसक अनेक कृतींना ईआयए मसुद्यामधून सूट देण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये सुरक्षित राहणार नाहीत. बी-२ श्रेणीतील प्रकल्पांचे ज्यात धोकादायक उद्योग (रेड आणि आॅरेंज इंडस्ट्रिज) जोडले गेले आहेत त्यांचे आता मूल्यांकन केले जाणार नाही. अधिसूचनेचा मसुदा हा प्रकल्पधारकांना एक्स-पोस्ट फॅक्टो ईसी मंजूर करण्यास अनुमती देतो जे कायद्याचे (क्लॉज-२२) स्पष्ट उल्लंघन करते. आपले पर्यावरण वाचवण्याच्या हे अगदी विपरित असल्याचे मंत्री ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
ईआयए मसुदा अहवाल जनतेसाठी उपलब्ध होणार नाही; परंतु केवळ लेखी विनंतीवरच उपलब्ध करून देण्यात येईल आणि तो देखील कार्यालयीन वेळेत अधिसूचित ठिकाणी इलेक्ट्रॉनिक तपासणीसाठी उपलब्ध होईल.
जनतेसोबत विचारविनिमय केल्याशिवाय प्रकल्प पूर्ण केले तर कोकणातील पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील प्रदेशातील २.८ कोटींपेक्षा जास्त लोक राहतात, त्यांच्यावर विपरित परिणाम होईल, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. जगातील जैविक विविधतेच्या आठ हॉटेस्ट हॉटस्पॉटमध्ये असलेल्या पश्चिम घाटाबाबतही त्यांनी पत्रामध्ये नमूद केले असून या घाटाचा एक मोठा भाग पर्यावरणीयदृष्ष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. (महासंवाद)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here