शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

(Last Updated On: August 12, 2020)

मुंबई : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांच्या हातात शिवबंधन बांधलं. यावेळी पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
सन 2019 मधील विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख यांनी अहमदनगरमधील नेवासा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आज त्यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *