Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राज्यातील १० अधिकाºयांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलिस पदक

राज्यातील १० अधिकाºयांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलिस पदक

32

नवी दिल्ली : उत्कृष्ट तपास कार्य करणाºया देशातील १२१ पोलिस अधिकारी-कर्मचाºयांना बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाचे विशेष पोलिस पदक जाहीर झाले आहे. यात महाराष्ट्रातील १० अधिकाºयांचा समावेश आहे.
उत्तम तपास कार्य करणाºया पोलिसांच्या कार्याची दखल घेत गृहमंत्रालयाने आज २०२० वर्षाच्या विशेष पोलिस पदकांची घोषणा केली. पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा व उत्तम तपास कार्याची दखल म्हणून २०१८ पासून सुरू झालेल्या या पुरस्कारासाठी यावर्षी महाराष्ट्रातील १० अधिकाºयांची निवड झाली आहे.
यात शिवाजी पंडितराव पवार सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा, पुणे शहर), राजेंद्र सिदराम बोकडे पोलिस निरीक्षक, उत्तम दत्तात्रेय सोनवणे पोलिस निरीक्षक, नरेंद्र्र कृष्णराव हिवरे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ज्योती लक्ष्मण क्षीरसागर पोलिस अधीक्षक, अनिल तुकाराम घेरडीकर उप विभागीय पोलिस अधिकारी, नारायण देवदास शिरगावकर उप पोलिस अधीक्षक (उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती), समीर नाजीर शेख सहायक आयुक्त (गुन्हे शाखा,नाशिक शहर), किसन भगवान गवळी सहायक आयुक्त, कोंडीराम रघू पोपेरे पोलिस निरीक्षक़

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here