विस्तार अधिकारीसह सरपंच, उपसरपंच जाळ्यात

उपराजधानी नागपूर

नागपूर : पंचायत समिती चिमूर जि. चंद्र्रपूर येथील विस्तार अधिकारी (पंचायत) हेमंत लक्ष्मण हुमणे यांना भिसी येथील सरपंच योगिता अरुण गोहणे आणि उपसरपंच लिलाधर प्रभाकर बन्सोड यांच्यासह 30 हजा रुपयांची लाच स्वीकारताना लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील पथकाने रंगेहात पकडले आहे. यामुळे पंचायत समितीतील कर्मचाºयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांना ग्राम पंचायत भिसी येथे ग्रामसेवक असताना ग्रामपंचायत भिसी अंतर्गत होणाºया कामांचा ई-टेंडरिंगची प्रक्रिया बरोबर राबवली नाही असा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले होते. सदर प्रकरणाची तक्रारदार आणि अन्य काही लोकांविरुद्ध विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमणे यांच्या मार्फत चौकशी सुरू होती. सदर चौकशीतून नाव काढण्यासाठी विस्तार अधिकारी हुमणे 30 हजारांच्या लाचेची मागणी केली आणि लाच
देण्यासाठी योगिता गोहणे व उपसरपंच लिलाधर बन्सोड यांनी तक्रारदारास अपप्रेरणा दिली. मात्र, तक्रारदारास लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सापळा रचून सरपंच गोहणे व उपसरपंच बन्सोड रंगेहात पकडण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर व अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक अविनाश भामरे, निलेश सुरडकर, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, अरुण हटवार, संदेश वाघमारे,रोशन चांदेकर, नरेश नन्नावरे, समीक्षा भोंगळे व चालक दामोदर करंबे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *