Home राष्ट्रीय काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन

काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन

68

नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
काँग्रेसचे आक्रमक प्रवक्ते म्हणून राजीव त्यागी यांची ओळख होती. दूरचित्रवाणी राजकीय चर्चासत्रांमध्ये ते नेहमीच काँग्रेसची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. राजीव त्यागी यांच्या निधनानंतर काँग्रेसने समाज माध्यमातून दु:ख व्यक्त केले. राजीव त्यागी यांच्या आकस्मिक निधनाने मोठं दु:ख झालं, ते एक कट्टर काँग्रेसी आणि एक सच्चा देशभक्त होते.