मुलींचाही वडिलांच्या संपत्तीत अधिकार

राष्ट्रीय

नवी दिल्ली : मुलींचाही वडिलांच्या संपत्तीवर मुलांइतकाच अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी एका अतिशय महत्त्वाच्या निर्णयात स्पष्ट केले आहे. न्यायाधीश अरुण मिश्रा यांच्या नेत्तृत्त्वाखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने याबाबतचा निर्णय दिला.
हिंदू वारसा दुरुस्ती 2005 अस्तित्वात आला, त्यावेळी वडील हयात असो किंवा नसो मुलींना मुलांप्रमाणेच त्यांच्या संपत्तीमध्ये समान हक्क मिळणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. ज्याअंतर्गत ९ सप्टेंबर २००५ रोजी हयात असणाºया सर्व मुलींना या सुधारित कायद्यान्वये मिळणारे अधिकार प्राप्त होतील. ९ सप्टेंबर २००५ रोजी तत्कालीन केंद्र सरकारकडून हिंदू वारसा कायद्यातील कलम ६ मध्ये महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली होती. वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीमध्ये किंवा एकूणच संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे मुलींनाही समसमान वाटा मिळण्यासंदर्भातील ही दुरुस्ती होती. दरम्यान, २००५ पूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास मुलींना हा हक्क मिळणार की नाही याबाबत स्पष्टता नव्हती; परंतु आता ही बाब स्पष्ट झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *