Home राष्ट्रीय सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष सुनावणी

277

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. टाळेबंदीच्या काळात २५ मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात काही प्रकरणात व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सुनावणी सुरू होती.
आता संपूर्ण दक्षता घेऊन प्रत्यक्ष सुनावणी करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या पीठाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या १५ पीठांपैकी दोन ते तीन पीठांमध्ये ही सुनावणी सुरू होणार आहे.
सुप्रीम कोर्ट अ‍ॅडव्होकेट्स आॅन रिकॉर्ड एसोशिएशन (एससीएओआरए) चे अध्यक्ष शिवाजी एम. जाधव यांच्यानुसार, सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्याद्वारा गठित सात न्यायमूर्तींच्या समितीने मंगळवारी बार नेत्यांशी चर्चा केली़ समिती पुढील आठवड्यापासून किमान दोन ते तीन शारीरिक न्यायालय सुरू करण्यावर गंभीरतापूर्वक चर्चा करत आहे.