खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan

(Last Updated On: September 28, 2020)

संपूर्ण भारतात 15 आॅगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. इतर देशांमध्ये वेगवेगळ्या दिनी स्वातंत्र्य दिन साजरा होतो. भौतिक अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे एखादा देश जो दुसºयाच्या गुलामीतून ज्या दिवशी मुक्त होतो त्या दिवसाला स्वातंत्र्यदिन असं मानलं जातं. अध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वातंत्र्याचा अर्थ आत्म्याची मुक्तता अशा अर्थाने घेतला जातो.
आपला आत्मा आपल्या अंतरातील प्रकाश, प्रेम तसंच शांतीने परिपूर्ण आहे. आपल्यातील हे खजिने मन, माया आणि भ्रम याच्याही पलीकडे दडलेले आहेत. आपले लक्ष आपल्या अंतरातील आत्म्याकडे न जाता भौतिक जगात गुंतलेलं आहे. आपण मनात निर्माण होणाºया इच्छांमुळे आपल्या आत्म्यावर मन मायेचे पडदे वाढवत आहोत आणि यामुळेच आपल्यात काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार यांची सतत वाढ होत राहते. या सर्व अडचणींवर मात करून आपल्या आत्म्याची अनुभूती घेण्यासाठी आपल्याकडे कोणता मार्ग आहे का? याकरिता या भूतलावर सर्वत्र शोध घेण्याची आवश्यकता नाही. सौभाग्याने, युगानुयुगे संत-महात्मे आत्मज्ञानाच्या क्षेत्रात विकास करीत आलेले आहेत. आपल्या अंतरी ध्यान टिकवण्यात त्यांनी सफलता प्राप्त केली आहे. यालाच ध्यान, मौन प्रार्थना किंवा अंतर्मुख होणे असं म्हणतात. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते म्हणतात, खरं स्वातंत्र्य तेव्हाच मिळतं जेव्हा आपण शांत अवस्थेत बसतो, डोळे मिटतो आणि आपलं लक्ष दिव्यचक्षूवर केंद्रित करून प्रभूच्या ज्योतीचा अनुभव घेतो. जर आपण आपल्या आत्म्यावर पडलेल्या मन-मायेच्या अनेक आवरणांना हटवण्यात सफल झालो तरच आपण आपल्या खºया आत्मस्वरुपास पाहू शकू, जो ज्योतीने प्रकाशमान आहे.
जेव्हा आपला आत्मा शरीर आणि मन यांच्या कैदेतून मुक्त होतो तेव्हा मुक्त झाल्यामुळे आनंदित होऊन उर्ध्व गतीस प्राप्त करतो. या भौतिक जगताच्या स्थान आणि काल यांच्या सीमेपलीकडे गेल्यावर आपल्या आत्म्याला अनंत अशा निजस्वरुपाची ओळख होते. या भौतिक जगाच्या पलीकडील अध्यात्मिक मंडलातील प्रसन्नता आणि आनंद याचा अनुभव करू लागतो.
या अध्यात्मिक यात्रेचा प्रारंभ आंतरिक प्रकाशाचं दर्शन घेतल्याने तसेच आंतरिक नाद ऐकल्याने सुरू होतो. जितके जितके आपण यात गढून जाऊ तितके आपण शारीरिक जाणीवेच्या पलीकडे जातो. हळूहळू स्थुल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण मंडले पार करून सत्य लोकात निजधामी परत जातो. या ठिकाणी आपला आत्मा स्वत:चे मूलस्वरूप पाहू शकतो आणि आपण परमात्म्याचे अंश आहोत याचा अनुभव घेऊ शकतो. तेव्हा आपला आत्मा स्वत:चे स्त्रोत असलेल्या परमात्म्यात विलीन होतो. अपार प्रसन्नता, परमानंद आणि प्रभू प्रेमाने युक्त असा होतो.
भौतिक स्वातंत्र्याबरोबरच आपण आत्मिक स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी आपल्याला आपल्या अंतरातील प्रकाश आणि नाद यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्यात आत्म्याची अपारशक्ती तसेच ऊर्जा आहे. आपल्या आत्म्यात विवेक, निर्भयता, अमरत्व, आनंद, प्रेम आणि परमानंद असे अनेक महान गुण आहेत. आत्मा त्याच्या अनंत शक्तीशी जोडले गेल्याने आपलं संपूर्ण जीवन परिवर्तित आणि तेजस्वी होईल.

*****

3 thoughts on “खरोखरचे स्वातंत्र्य प्राप्त करा… SAAY pasaaydan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *