भेसळयुक्त इंधन पुरवठ्याची तत्काळ चौकशी करा

(Last Updated On: August 15, 2020)

भंडारा : महाराष्ट्र राज्यामध्ये बायोडिझलच्या नावाने भेसळयुक्त डिझेल व इंधनाचा पुरवठा करणाºयांवर चौकशी करून शासकीय निकषानुसार सदर पंप सुरू आहे अथवा नाही याबाबत तात्काळ तपासणी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त यांना दिले. या संदर्भातील निवेदन फेडरेशन आॅफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे सचिव अमित गुप्ता यांनी विधानसभा अध्यक्षांना दिले होते.
शासन परिपत्रकाचा गैरफायदा घेऊन अनेक भेसळयुक्त इंधनाचा पुरवठा करणारे माफिया सक्रिय झाले असून अधिकृत असल्याचे दाखवून लहान टँकरमध्ये पंप बसवून जागोजागी वाहनामध्ये त्याची विक्री सुरू आहे. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आवश्यक सर्व परवाने बायोडिझेल विक्रीसाठी घेणे बंधनकारक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
देशात कोणत्याही पेट्रोलियम पदार्थाची विक्री करताना भारतीय मानक ब्युरोने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे. बायोडिझेल या निर्देशानुसार बी -१०० डिझेलची घनता ०.८६० ते ०.९०० या दरम्यान असणे आवश्यक आहे. परंतु घनतेच्या इंधनावर वाहन चालविणे शक्य नाही म्हणून या इंधनामध्ये इंपोर्टेड डिझेल, फ्युएल आॅईल एमटीओ व केरोसिनची भेसळ केल्या जात आहे. सध्या बाजारात विक्री केल्या जाणाºया बायोडिझेलची घनता ०.८२५ ते ०.८३० च्या जवळपास आहे. भारतीय मानक प्रमाणे ती २० टक्के आहे. राज्य शासनाला डिझेल विक्रीमुळे २१ टक्के टॅक्स अधिक ३ रुपये सेस मिळतो. अशा भेसळयुक्त डिझेल विक्रीमध्ये कर चोरी होत असल्यामुळे राज्यशासनाला महसुली उत्पन्नाचे नुकसान होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *