Home प्रादेशिक विदर्भ इरई नदीच्या सौंदर्यीकरणासाठी १०० कोटी देणार

इरई नदीच्या सौंदर्यीकरणासाठी १०० कोटी देणार

227

चंद्र्रपूर : जिल्हा खनिज प्रतिष्ठान, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत जिल्ह्यातील पूर्ण झालेली कामे व प्रस्तावित कामांची आढावा बैठक पार पडली. चंद्र्रपूर शहराची जीवनदाहीनी अशी ओळख असलेल्या इरई नदीच्या काठावर संरक्षक भिंत व नदीकाठच्या परिसरातील जागेवर सौंदर्यीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून १०० कोटी रुपये देणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीस आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा खनिकर्म अधिकारी जी.डी.कांबळे, अपर संचालक वन अकादमी प्रशांत खाडे तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्ह्यातील उर्वरित कामांचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत अशा सूचना यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. बफर झोन क्षेत्रातील तसेच बाधित क्षेत्रातील शाळांचे सर्वेक्षण करून शाळेतील संरक्षण भिंतीचे बांधकाम तसेच शुद्ध पाण्याची व्यवस्था त्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेला दिल्या. (महासंवाद)