Home उपराजधानी नागपूर कोरोना मृत्यूदर कमी व्हावा : डॉ. नितीन राऊत

कोरोना मृत्यूदर कमी व्हावा : डॉ. नितीन राऊत

193

नागपूर : डॉक्टर, कोरोनायोद्धे आणि प्रशासकीय यंत्रणेने कोरोनामुळे होणारे मृत्यू कमी करावा़ तसेच, दुरुस्ती दर वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत. खासगी रुग्णालयांनी मार्गदर्शकतत्त्वांची अंमलबजावणी करत शासनाला सूचना कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात शहरातील खासगी डॉक्टरांशी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि नियंत्रण मिळविण्यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. त्याची कारणे तपासून वेळीच आवश्यक त्या उपाययोजना करा. कारण रुग्णालयात रुग्ण उशिरा पोहचत आहेत. त्यामुळे मृत्यूदर वाढत आहे. रुग्ण रुग्णालयात पुरेशा वेळेत उपचार घ्यायला आल्यास कोरोनावर नियंत्रण मिळविणे सोपे होईल, असे पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले.
खासगी रुग्णालयात आलेला प्रत्येक रुग्ण कोविड 19 असल्याचे समजून त्यांना कोरोनाची अँटीजेन चाचणीसाठी समुपदेशन करावे. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचारासाठी वेळ लागणार नाही. परिणामी रुग्णालयात पोहोचून वेळेत उपचार मिळतील. रुग्णांच्या नातेवाईक आणि शेजाºयांनी रुग्णांवर सामाजिक बहिष्कार टाकू नये. यासाठी त्यांचे समुपदेशन करावे. डॉक्टरांनी कोरोना काळात मानवीय दृष्टिकोनातून उपचार करावेत, असेही ते म्हणाले.
मृत्यूदर कमी करण्यासाठी मोहल्ला, वार्डनिहाय कोविड नियंत्रण समिती गठीत करणे, घरोघरी सर्वेक्षण करणे, एन.जी.ओ.ची मदत घेणे, त्यांचे आवश्यक सहकार्य घ्यावे. खाजगी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांना सेवा आणि बेड्स उपलब्ध करुन द्यावेत. यावेळी कोविडचे दिल्ली मॉडेल आणि न्यूझीलंड मॉडेलही राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. चाचण्या, ट्रेसिंग आणि हॉस्पिटल्समध्ये बेड्स वाढविणे, प्लाज्मा बँक सुदृढ करणे आदीबाबत चर्चा करण्यात आली. (महासंवाद)