जय जवान, जय किसान, जय कामगार हेच ध्येय : मुख्यमंत्री

राजधानी मुंबई

मुंबई : जय जवान, जय किसान, जय कामगार हे यापुढे आपल्या राज्याचे ध्येय असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 73 व्या स्वातंत्र्यदिन वर्धापनदिनानिमित्ताने केली.
किसान हरितक्रांती करतात तर जवान आपल्या देशाचे रक्षण, त्याचबरोबरीने आपले कामगार सुद्धा उद्योगाची बाजू समर्थपणे सांभाळतात. शिवाय राज्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या उपलब्धतेसाठी महाजॉब पोर्टल सुरू केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.                                          विधानभवनात ध्वजारोहण
विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेन्द्र भागवत, सभापती यांचे सचिव महेंद्र काज, उपसचिव ऋतुराज कुडतरकर, अवर सचिव रविंद्र जगदाळे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मानवंदना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *