Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यदिन

महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यदिन

52

नवी दिल्ली : भारत देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिन राजधानीतील उभय महाराष्ट्र सदनांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांच्या हस्ते कस्तुरबा गांधी मार्ग आणि कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समूह राष्ट्रगीताचे सादरीकरण आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पथसंचलन झाले.
कार्यक्रमास चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार सुरेश धानोरकर, महाराष्ट्र सदनाच्या गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र सदनात निवासात असणारे अतिथी तसेच दिल्ली स्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. (महासंवाद)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here