पोलिस आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

उपराजधानी नागपूर

नागपूर : शहर पोलिस आयुक्त कार्यालय येथे प्रभारी सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. निलेश भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम समारंभ पार पडला.
कार्यक्रमादरम्यान नागपूर शहरातील कार्यरत केंद्रीय पोलिस पदकप्राप्त व महासंचालक पदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस मुख्यालयातील नागरिकांच्या आरोग्यासाठी व सुरक्षेसाठी आहोरात्र स्वच्छता हीच सेवा मानून केलेल्या कार्याबद्दल पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी विभागातील कार्यरत सफाई कामगार यांना कोरोना योध्द्धा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित केले. कार्यक्रमात सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *