Home राष्ट्रीय स्वातंत्र्यदिनी देशवासीयांच्या आरोग्याबाबत पंतप्रधानांची मोठी घोषणा

स्वातंत्र्यदिनी देशवासीयांच्या आरोग्याबाबत पंतप्रधानांची मोठी घोषणा

141

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना देशवासीयांच्या आरोग्याबाबत मोठी घोषणा केली आहे. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनअंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य ओळखपत्र तयार केले जाणार आहे.
आजपासून या अभियानाची सुरुवात होत असून आरोग्य क्षेत्रासाठी ही मोठी क्रांती असेल. नागरिकांचा उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, त्यासाठी प्रत्येकाला एक आरोग्य ओळखपत्र दिले जाईल. संबंधित नागरिकाच्या आरोग्याबाबत त्यात माहिती असेल. यामुळे त्याला उपचार घेणे सोपे होईल. या अभिनयानाअंतर्गत उपचारामध्ये येणाºया समस्या कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुविचारित पद्धतीने विचार करण्यात येणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशातील नागरिकांना आरोग्य ओळखपत्र बनवणे गरजेचे असून याअंतर्गत होणारे उपचार आणि विविध चाचण्याची माहिती डिजिटली साठवली जाईल. त्यामुळे देशातील कोणत्याही रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास जुने-नवे तपासणी अहवाल नेण्याची आवश्यकता नाही. तुमच्या युनिक आयडीच्या माध्यमातून डॉक्टरांना याबाबत माहिती मिळेल. याशिवाय
प्रत्येक व्यक्तीचा मेडिकल डेटा ठेवण्यासाठी रुग्णालय, क्लिनिक, डॉक्टर यांना एका सेंट्रल सर्व्हरशी जोडण्यात येतील, असेही पंतप्रधान म्हणाले.