वाकड्या नजरेला चोख प्रत्युत्तर : पंतप्रधान

(Last Updated On: August 15, 2020)

नवी दिल्ली : एलओसीपासून एलएसीपर्यंत ज्याने कुणी देशाकडे वाकड्या नजरेने पाहिले त्याला भारतीय जवानांनी त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरील भाषणात सांगितले.
भारताच्या सार्वभौमत्वाचा आदर हा सर्वोच्च आहे. यासाठी सीमारेषेवर जवान आपले प्राण झोकून देतात. भारत काय करू शकतो हे लडाखमधील घटनेतून संपूर्ण जगाने अनुभवले आहे, असे मोदी म्हणाले. भारतात सातत्याने सीमारेषेवर आणि काश्मिरमध्ये दहशतवादी कृत्ये करणाºया आणि त्यांना प्रोत्सान देणाºया पाकिस्तानला तसेच विस्तारवादी चीनला सूचक इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला़.
तीन लशी
वैज्ञानिकांचे पथक कोरोना लशीसाठी सातत्याने मेहनत घेत आहे. देशामध्ये तीन- तीन लशी विविध टप्प्यामध्ये आहेत. प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी आराखडा तयार असून वैज्ञानिकांकडून हिरवा कंदिल मिळताच लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याची देशाची तयारी आहे, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. (छायाचित्र : साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *