नागपुरात कोविड रुग्णांसाठी जम्बो हॉस्पिटल : डॉ.राऊत

(Last Updated On: August 17, 2020)

नागपूर  : विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधांनी सुसज्ज असे जम्बो रुग्णालय मानकापूर  [kovid jambo hospital mankapur] येथे उभारण्यात येणार आहे. सुमारे एक हजार रुग्णांसाठी सुविधा येथे उपलब्ध होईल, अशी माहिती आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
एएए हेल्थ कन्संटन्सी सर्व्हिसेसचे डॉ. अहमद मेकलाई, डॉ.अमृता सूचक, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप गोडे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, डॉ. दीपक सेलोकर, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवि चव्हाण आदी उपस्थित होते.
कोवीड रुग्णांसाठी मुंबई तसेच पुणे येथे जम्बो रुग्णालय‘ची स्थापना करण्यात आली आहे. त्याच पद्धतीने शहरात देखील एक हजार रुग्णांसाठी अशाच रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार आहे. यादृष्टीने राधास्वामी सत्संग (कळमेश्वर), शालिनीताई मेघे वैद्यकीय महाविद्यालय, यशवंत स्टेडियम, पटवर्धन मैदान, व्हीसीए स्टेडियम, मानकापूर स्टेडियम या ठिकाणांसंबंधी डॉ. राऊत यांनी माहिती घेतली. यानंतर मानकापूर स्टेडियम सर्व दृष्टीने सुलभ असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *