Home प्रादेशिक पश्चिम महाराष्ट्र राज्यपाल कोश्यारी यांची किल्ले शिवनेरीला भेट

राज्यपाल कोश्यारी यांची किल्ले शिवनेरीला भेट

77

पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले.
राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली, हे विशेष. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले.
राज्यपालांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी पायी सर केला, ही आमच्यासारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. तसेच, प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मनापासून स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड संवर्धन मोहिमेत सरकारने शिवप्रेमींना सहकार्य करून पाठिंबा द्यावा ही अपेक्षा नेहमीच करण्यात आला. आता राज्यपालांनी प्रत्येक मंत्र्याला गड दत्तक घेण्याची सूचना अगदी रास्त आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी सोशल मीडियाद्वारे म्हटले आहे.