Home राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मंत्री चेतन चौहान यांचा कोरोनामुळे मृत्यू

मंत्री चेतन चौहान यांचा कोरोनामुळे मृत्यू

27

लखनौ : उत्तर प्रदेशचे क्रीडा, युवक कल्याणमंत्री तसेच माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे आज कोरोना संसर्गामुळे निधन झाले. त्यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी याबाबत माहिती दिली.
मागच्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर मंत्री चौहान यांना लखनऊमधील गांधी पीजीआय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले. याठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली. उत्तर प्रदेशातील अमरोह मतदारसंघाचे खासदार म्हणून ते दोन वेळा निवडून आले होते.
मूळचे क्रिकेटपटू असलेल्या चौहान यांनी ४० कसोटी सामन्यात १६ अर्धशतकांसह २ हजार ८४ धावा केल्या. सात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधेही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. १९८१ साली त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here