दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या स्मृतीदिनी आदरांजली

राष्ट्रीय

नवी दिल्ली : माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या दुसºया स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी दिल्लीमधील सदैव अटल या वाजपेयींच्या समाधीस्थळावर पुष्पांजली वाहिली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य देशाच्या पुढच्या वाटचालीत सदैव प्रेरणा देत राहील, असे म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही वाजपेयी यांना अभिवादन केले.
निखळ कवी, अमोघ वक्ते आणि प्रांजळ व्यक्तिमत्वाचे अटलजी सदैव संस्मरणीय राहतील असे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. वाजपेयी हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक होते. महान लेखक, संवेदनशील कवी होते, संसदिय लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेऊन त्यांनी राजकारण केले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाजपेयी यांना अभिवादन केले. अटलजी आज आपल्यात नाही, यावर विस्वास बसत नाही. देशकार्यासाठी त्यांचे विचार सदैव प्रेरणा देत राहतील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *