पाच कोटी रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट

(Last Updated On: August 17, 2020)

नवी दिल्ली : सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात येत्या पाच वर्षांच्या काळात सुमारे पाच कोटी रोजगार निर्माण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे, असे मत केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम (सुलम) उद्योमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
ते आज नवी दिल्ली येथे स्वालंबन २०२० या ई-शिखर परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते.
सुलम क्षेत्राने आतापर्यंत ११ कोटी रोजगार निर्मिती केली आहे, अशी माहिती मंत्री गडकरी यांनी दिली. देशाच्या एकूण निर्यातीत क्षेत्राचा ४८ टक्के वाटा आहे. ते प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे नियोजन असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *