दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन

(Last Updated On: August 18, 2020)

हैदराबाद : दिग्दर्शक, लेखक ,अभिनेता निशिकांत कामत यांचे सोमवारी सायंकाळी 4.24 वाजता निधन झाले. त्यांच्यावर हैदराबादेतील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्यांचे वय 50 वर्षे इतके होते.
निशिकांत कामत यांना गेल्या अनेक वर्षांपासून लिव्हर सिरोसिस नावाच्या आजाराने ग्रासले होते. 31 जुलै रोजी कामत यांना हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास निशिकांत कामत यांच्या प्रकृतीसंदर्भात रुग्णालयाकडून एक निवेदन प्रसिद्ध केले होते़ त्यात निशिकांत यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर सायंकाळी त्यांच्या निधनाचीच बातमी जाहीर करण्यात आली.
निशिकांत कामत यांनी सन 2015 मध्ये अजय देवगण आणि तब्बू यांच्यासोबत दृष्यम, इरफान खानसोबत मुंबई मेरी जान आणि मदारी, जॉन अब्राहमसोबत फोर्स आणि रॉकी हँडसम सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मराठी चित्रपटांत डोंबिवली फास्ट, रितेश देशमुख आणि राधिका आपटे अभिनित लय भारी याशिवाय फुगे यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सातच्या आत घरात चित्रपटात लेखक आणि अभिनेता म्हणूनही काम केले होते. 2022 मध्ये पडद्यावर आणण्याचे निश्चित असलेल्या दर-ब-दरच्या दिग्दर्शनाची ते तयारी करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *