Home उपराजधानी नागपूर ‘या’ राज्यात तयार होतोय जगातील सर्वाधिक उंचीचा रेल्वेपूल

‘या’ राज्यात तयार होतोय जगातील सर्वाधिक उंचीचा रेल्वेपूल

311

अभिवृत्त न्यूज ब्युरो
भारतीय रेल्वेच्या वतीने जगातील सर्वाधिक उंचीचा पूल [highest railway bridge] मणिपूर राज्यातील नोनी जिल्ह्यात इजाई नदीवर उभारण्यात येत आहे. पुलाच्या सर्वात मोठ्या खांबाची उंची १४१ मीटर्स अर्थात 462 फुट असणार आहे. सध्या युरोपातील मोंटेनीग्रोमधील माला-रिजेका वायाडक्ट हा १३९ मीटर उंचीचा पुल जगातील सर्वाधिक उंचीचा मानला जातो.
देशाच्या उत्तर पूर्व भागात रेल्वे जाळे विणण्यासाठी मणिपूरमधील नोनी जिल्ह्यात मारनचिंग येथे (इम्फाळपासून 65 किमी) इजाई नदीवर भारतीय रेल्वे विभागाकडून 703 मीटर्स लांबीचा पुल तयार करण्यात येत आहे. हा पुल जिरीबम- तुपुल- इम्फाळ या ब्राँड गेज रेल्वे प्रकल्पाचा भाग असेल़ हा मार्ग सुमारे 111 किमी असून प्रकल्पात एकूण 45 बोगदे बांधण्यात येणार आहे. बारा क्रमांकाचा बोगदा हा सर्वांत लांब म्हणजे 10.280 किमी अंतराचा असेल. दरम्यान, पुलाचा सर्वांत मोठ्या खांबाची (पायर्स) रचना ही भारतीय अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. पुलाचे पाईर्स हायड्रॉलिक आॅगर्स वापरून तयार केले आहेत. कुशल आणि सातत्याने बांधकाम सुनिश्चित करण्यासाठी उंच उंच भागात विशेषत: डिझाइन केलेले स्लिप-फॉर्म तंत्र आवश्यक आहे. स्टील गर्डर कार्यशाळेत तयार केलेले असतात. प्रत्यक्ष ठिकाणी त्याची जोडणी केली जाते, असे रेल्वेच्या एका अधिकाºयाने सांगितले. पुलासाठी २८० कोटी रुपये खर्च येणार असून मार्च २०२२ पर्यंंत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाºयांनी व्यक्त केली.