राज्यात २० आॅगस्टपासून सामाजिक ऐक्य पंधरवडा

राजधानी मुंबई

मुंबई : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा २० आॅगस्ट हा जयंती दिवस दरवर्षी सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने राज्यात २० आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २०२० या कालावधीत सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध भागातील विविध धर्माच्या व विविध भाषा बोलणाºया लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्दभाव वृद्धींगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
सद्भावना दिवस व सद्भावना पंधरवडा हा कोरोना विषाणुच्या संसगार्ची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या प्रांगणात सामाजिक अंतराचे पालन करून २० आॅगस्ट रोजी सद्भावना दिवस साजरा करण्यात येणार असून उपस्थितांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातून आॅनलाईन किंवा लाऊड स्पिकरमार्फत सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा, तसेच अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा आपल्या पाहाता यावा यासाठी संकेतस्थळांद्वारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्यासाठी कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी आॅनलाईन वेबिनार आदीद्वारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावेत. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे. बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषत: युवकांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्य संचालक यांनी सद्भावना विषयावर आॅनलाईन वेबिनार आदीद्वारा संवाद, मार्गदर्शक कार्यक्रम आयोजित करावा. यंदा सद्भावना शर्यतसारखे उपक्रम आयोजित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *