Home राष्ट्रीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल

85

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह यांना आज नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये दाखल केले आहे.
अमित शाह यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याने सोमवारी रात्री एम्समध्ये दाखल केले. त्यांच्या कोविड-9 च्या परीक्षणात विषाणू संसर्ग आढळला नसल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यानंतर अमित शाह यांना 2 आॅगस्ट रोजी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर 14 आॅगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याने ते घरी परतले होते.