Home राष्ट्रीय राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे गोव्याचीही जबाबदारी

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे गोव्याचीही जबाबदारी

66

नवी दिल्ली : गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मेघालयाच्या राज्यपालपदी करण्यात आली असून महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिले आहे.
सत्यपाल मलिक यांना जम्मू – काश्मीरच्या राज्यपाल पदाचीही जबाबदारी सांभाळल्यानंतर २५ आॅक्टोबर २०१९ रोजी गोव्यात पाठवले होते. आता त्यांची नवी नियुक्ती मेघालयात करण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये मलिक राज्यपाल असतानाच केंद्र सरकारने कलम ३७० बाबत मोठा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. जम्मू काश्मीरचे केंद्रशासित प्रदेशात रुपांतर करण्यात आल्यानंतर त्यांना गोव्यात धाडण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here