Home उपराजधानी नागपूर नागपुरात एकाच कुटुंबातील चौघे मृतावस्थेत

नागपुरात एकाच कुटुंबातील चौघे मृतावस्थेत

78

नागपूर : दोन चिमुकल्यांसह आईवडील असे चौघेजण कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपल्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
कोराडीतील जगनाडे ले-आऊटमध्ये डॉ. धीरज राणे (४५), डॉ. सुषमा (४०) हे पतीपत्नी वास्तव्यास असून, आज दुपारी त्यांचे दोन मुलांसह मृतदेह आढळून आले. गळफास लावत आत्महत्या करून जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही दुर्घटना आत्महत्या की घातपात, याबाबत कोराडी पोलिस तपास करीत आहेत.
माहितीनुसार, डॉ. धीरज राणे नागपुरातील खासगी महाविद्यालयात विभाग प्रमुख होते, तर त्यांची पत्नी स्थानिक खासगी रुग्णालयात कार्यरत होती. घटना उघडकीस आली त्यावेळी डॉ. सुषमा गळफास लावलेल्या दिसून आल्या. उर्वरित तिघांचे मृतदेह शयनकक्षात आढळून आले आहेत.