Home राजधानी मुंबई अंत्यसंस्कार करणाºया सामाजिक संस्थांच्या कर्मचाºयांना २५ लाखांचे विमा संरक्षण

अंत्यसंस्कार करणाºया सामाजिक संस्थांच्या कर्मचाºयांना २५ लाखांचे विमा संरक्षण

57

मुंबई: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाºया सामाजिक संस्था किंवा संघटनांच्या कर्मचाºयांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
दुर्दैवाने कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास विमा संरक्षण लागू असेल. यासाठी संबंधित संस्था तसेच संघटनेच्या कर्मचाºयांची ग्रामपंचातीत नोंद असणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय संबंधित कर्मचाºयाला कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले तर दाखल करण्याच्या किंवा त्याच्या मृत्यूच्या तारखेआधी १४ दिवसांच्या काळात तो कर्तव्यावर हजर असला पाहिजे, अशी अटही विमा संरक्षणासाठी असणार आहे.
सध्या याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असेल, त्यानंतर परिस्थिती पाहून मुदत वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात सर्व जिल्हा परिषदांनाही सूचना दिल्या असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here