लालपरी धावणार आजपासून

(Last Updated On: August 20, 2020)

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे तब्बल पाच महिने बंद असलेली सर्वसामान्यांची लालपरी अर्थात एसटी बस [Lalparee Maharashtra ST] २० आॅगस्टपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा (मूळ तिकीट दरात) टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता नाही. प्रवासात प्रवाशांनी कोविड – १९ च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे मात्र आवश्यक असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
२३ मार्च २०२० पासून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर – सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे. (महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *