राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

(Last Updated On: August 21, 2020)

मुंबई  : भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल क्रिकेटपटू रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू, महिला हॉकीपटू रानी रामपाल यांचे तसेच द्रोणाचार्य पुरस्कारविजेते प्रशिक्षक, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार आणि तेनसिंग पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र आॅलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
केंद्र सरकारने आज पाच खेळाडूंची खेलरत्न पुरस्कारासाठी, तेरा प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी, सत्तावीस क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी, पंधरा खेळाडूंची ध्यानचंद पुरस्कारासाठी तर आठ खेळाडूंची तेनसिंग पुरस्कारासाठी निवड जाहीर केली.
अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या यादीत घोडेस्वारीसाठी अजय सावंत, कुस्तीपटू राहुल आवारे, खोखोपटू सारिका काळे, नौकानयनपटू दत्तू भोकनाळ, टेबल टेनिसपटू मधुरिका पाटकर, पॅरास्विमिंग सुयश जाधव यांची, तर ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांच्या यादीत बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे, तृप्ती मुरगुंडे आदी खेळाडूंचा समावेश असून यांच्यासह राज्यातील व देशातील सर्व पुरस्कार विजेत्या खेळाडूंचे उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.(महासंवाद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *